शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टेहरेत उपसरपंचाच्या धान्य गुदामावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:27 IST

मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या स्वस्तधान्य दुकानाच्या गुदामावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून स्वस्त धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना रंगेहाथ पकडले.

मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या स्वस्तधान्य दुकानाच्या गुदामावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून स्वस्त धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ८ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किल्ला पोलीसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे गावा जवळील कौळाणे गावात गाळणे रस्त्यालगत टेहरेचे उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ संशयित मोहंमद गुफरान अब्दुल सुभान (दलाल) रा. रजापुरा गोल्डननगर, धान्य विकत घेणारा शितल सुभाषचंद्र लोहाडे (४५) रा. सावतानगर संगमेश्वर, अब्दुल इस्हाक अब्दुल सत्तार (दलाल) रा. महेवीनगर, पवारवाडी, वाहन मालक शेख बुºहाण शेख बुढण (५०) रा. गवळीवाडा मर्चंटनगर, चालक शेख इसार शेख इस्हाक (३०) रा. देवीचा मळा, पवारवाडी, चालक फारुख खान रमजान खान (३५) रा. हुडको कॉलनी, गरीब नवाज हॉलच्या पाठीमागे, सय्यद जाफर सय्यद सलीम (हमाल) रा. इंदिरानगर गवळीवाडा, धान्य विकणारा निसार शेख (फरार) दुकान नं. ४३/३ चाल मालक रा. आयेशानगर, धान्य साठवणूक करणारा नरेंद्र भगवान शेवाळे (फरार) रा. कौळाणे रस्ता टेहरे, कुंदन केदार (पीकअप वाहन क्र.) एम.एच.०२ वाय. ए. ६८६० चा फरार मालक रा. मालेगाव कॅम्प. हे जीवनावश्यक स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना मिळून आले. संशयितांविरोधात किल्ला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, तुषार गरुड, पोलीस कर्मचारी तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, सानप व पुरवठा निरीक्षण अधिकारी रणजीत रामाघरे यांनी काल रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.-------------------------------------संशयितांंच्या ताब्यातुन १३९ पोती, २ लाख २२ हजार ४०० रुपये किंमतीचा तांदूळ, ६ लाख रुपये किंमतीचे दोन पीकअप वाहन, १७ हजार ५०० रुपये किंमतीचे सहा भ्रमणध्वनी संच असा एकूण ८ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक