पाथर्डी गावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: March 7, 2017 21:20 IST2017-03-07T21:20:11+5:302017-03-07T21:20:11+5:30

शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा;२१ हजार १२० रुपयांची रोकड जप्त

Police raid on gambling street in Pathardi village | पाथर्डी गावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

पाथर्डी गावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

नाशिक : पाथर्डीगावातील राजवाड्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा टाकून सोळा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगाऱ्यांकडून २१ हजार रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़.
राजवाड्यातील दोंदे चाळीच्या टेरेसवर पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली होती़ त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या क्लबवर छापा टाकला असता संशयित राकेश धनंजय ओसुरकर (२५ रा.राणाप्रताप चौक,सिडको) या अड्डामालकासह पंधरा जुगारी जुगार खेळत होते़ पोलिसांनी या जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील २१ हजार १२० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले़
गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्यांविरोधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Police raid on gambling street in Pathardi village