जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: September 10, 2016 01:03 IST2016-09-10T01:03:18+5:302016-09-10T01:03:18+5:30

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Police raid on gambling stand | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

 नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी (दि़८) दुपारी पोलिसांनी छापा मारला़ यामध्ये जुगार अड्डा मालकासह नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़
महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीजवळील एका घरामध्ये गत अनेक दिवसांपासून बिनदिक्कतपणे हा जुगार अड्डा सुरू होता. दुपारच्या सुमारास या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला असता बाळकृष्ण प्रसाद (रा.सातपूर) या जुगार अड्डा मालकासह नऊ जुगारी पत्त्यांच्या कॅटवर जुगार खेळत होते़
पोलिसांनी या जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील चार हजार १३० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police raid on gambling stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.