वाघाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST2021-03-15T04:14:47+5:302021-03-15T04:14:47+5:30

वाघाडी परिसरात मोकळ्या पटांगणात शेडमध्ये पत्त्यांचा जुगारअड्डा चालत असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळताच दुपारी पोलिसांनी ...

Police raid gambling den in Waghadi | वाघाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

वाघाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

वाघाडी परिसरात मोकळ्या पटांगणात शेडमध्ये पत्त्यांचा जुगारअड्डा चालत असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळताच दुपारी पोलिसांनी त्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी काही संशयित त्या ठिकाणी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित सचिन अरुण पाटील, पिंटू ग्रेहान चव्हाण, मनोज रामभाऊ ढाकरजे, योगेश कौतिक मराठे, लक्ष्मण पोपट डोलनर, हेमंत उर्फ गणेश पुरुषोत्तम गोसावी, निलेश दिलीप सोनवणे, कोमल हरून शेख आदींना अटक केली आहे.

---इन्फो---

पळ काढताना जुगारी नाल्यात कोसळला

वाघाडीत जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पंचवटी पोलिसांच्या पथकाला बघून संशयित जुगारी पांडुरंग शेवाळे हा पळ काढण्याच्या प्रयत्नात एका भिंतीवरुन उडी मारत असताना नाल्यामध्ये कोसळून जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने पांडुरंगला नाल्यातून जखमी अवस्थेत पोलिसांनी बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला, हातापायांना मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: Police raid gambling den in Waghadi