जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: January 19, 2017 00:05 IST2017-01-19T00:05:34+5:302017-01-19T00:05:58+5:30

कारवाई : आठजण ताब्यात; मुद्देमाल जप्त

Police raid on gambling bases | जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

नाशिक : भद्रकालीतील खडकाळी चौकात सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर मंगळवारी (दि़ १७) सायंकाळी पोलिसांनी छापा मारला़ यामध्ये आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
भद्रकाली परिसरातील त्र्यंबक चौकात संशयित कमर आमद शेख (५०, रा. खडकाळी), अहमद अखतर खान (३४, रा. मुलतानपुरा), तसवर इसाक रंगरेज (४०, रा. खडकाळी) आणि रफीक रसीद पठाण (रा. खडकाळी) हे चौघे जुगार खेळत होते़ या चौघांवरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अनिल बाबूराव कांबळे (२७, रा. भद्रकाली), अन्वर ए. रहमान शेख (३२, रा. वडाळारोड) याच्यासह सागर मोहन ताते (१९, रा. मातंगवाडा) आणि अनिल बन्सीलाल जैन (४७, रा. काठेगल्ली) या चौघांना जुगार खेळताना अटक केली़ या चौघांवरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Police raid on gambling bases