वाडीव-हे : किसान मोर्चा नाशिक येथून पुन्हा एकदा मंत्रालयाच्या दिशेने निघाला असून मोर्चा रस्त्यात अनेक ठिकाणी थांबणार असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोठी कुमक वाडी-हे पोलिस स्टेशन हद्दीत महमार्गावरील आंबे बहुला शिवारात जमविली आहे. कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने नाशिक येथून किसान मोर्चाचे आयोजन केले असून हा मोर्चा पायी मुंबईकडे रवाना होत आहे. जिल्ह्याच्या कानकोप-यातून या मोर्चासाठी शेतकरी, कष्टकरी सहभागी होणार आहेत.विविध मागण्यांसाठी हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबई येथे मंत्रालयावर धडकणार आहे. या मोर्चाने मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता असल्याने शासनाने या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोठी कुमक आठवा मैल परिसरात एकत्र केली आहे. मोर्चेकऱ्यांची सुरक्षा लक्षात घेवून हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
किसान मोर्चाच्या बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी पोलीस कुमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 13:33 IST