वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी
By Admin | Updated: October 9, 2016 01:56 IST2016-10-09T01:54:46+5:302016-10-09T01:56:01+5:30
वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी
नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़८) दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात घडली.
दिलीप निवृत्ती वारुंगसे (३० रा. पोलीस मुख्यालय) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे़ दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते दुचाकीने इंदिरानगरकडून जॉगिंग ट्रॅकमार्गे पोलीस मुख्यालयाकडे जात होते़ भुयारी मार्गातून बाहेर पडत असताना सर्व्हिस रोडने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वारुंगसे यांना तेथील सेवा बजावणाऱ्या पोलिसाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)