शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील संघटना आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:51 IST

राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनदेखील राज्यातील सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील पोलीस पाटलांचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे यांनी दिली.

मातोरी : राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनदेखील राज्यातील सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील पोलीस पाटलांचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे यांनी दिली.  नाशिक जिल्ह्यातून आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यातून शेकडो पोलीस पाटील सहभागी होणार आहेत. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ, निवृत्तिवेतन, वारसा हक्क, निवृत्तीचे वय ६५ करावे यांसह अन्य मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील, राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन चिंतामण मोरे, बाजीराव नाना सावंत, अरुण पा. बोडके, संपतराव जाधव, अरुण महाले, बबनराव बेंडकुळे, रवींद्र जाधव, कैलास फोकणे, रमेश पिंगळे, पप्पू मोहिते आदींनी केले आहे.धरणे धरणारराज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ तसेच या मागण्यांवर तातडीने योग्य निर्णय घेण्यात यावा, याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक