बंदोबस्तावरील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
By Admin | Updated: October 16, 2014 19:00 IST2014-10-16T00:20:13+5:302014-10-16T19:00:47+5:30
बंदोबस्तावरील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

बंदोबस्तावरील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
नाशिकरोड : चेहेडी येथील मतदान केंद्रावर बंदोबस्ताला असलेल्या नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दशरथ जाधव यांचा कामाच्या ताणामुळे हृदयविकाराने मृत्यू झाला.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले दशरथ दौलत जाधव (४८), रा. चित्रकूट सोसायटी, पंचवटी यांना मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचार (सलाईन) घेऊन आज पहाटे ६ वाजता ते कामावर हजर झाले होते. जाधव यांना चेहेडी येथील मनपा शाळा मतदान केंद्रावर ग्राऊंड बंदोबस्तासाठी नेमलेले होते. कामाच्या ताणामुळे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जाधव यांना छातीत दुखू लागल्याने व खूप घाम आल्याने सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. बिटको रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून त्यांना पंचवटीतील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येत होते. बिटको हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच उलटी होऊन तसेच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार असून, पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)