शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पित्याकडून दोघा मुलांची गोळ्या झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 01:00 IST

फ्लॅट नावावर करण्याच्या वादातून पोलीस शिपायाने दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी पंचवटीत घडली. दोघा मुलांवर चार गोळ्या झाडल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी संजय भोये हा स्वत: पंचवटी पोलिसांना शरण आला असून, पोलिसांनी भोये यास ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पंचवटी : फ्लॅट नावावर करण्याच्या वादातून पोलीस शिपायाने दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी पंचवटीत घडली. दोघा मुलांवर चार गोळ्या झाडल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी संजय भोये हा स्वत: पंचवटी पोलिसांना शरण आला असून, पोलिसांनी भोये यास ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.पेठरोड नामको रुग्णालयामागे असलेल्या अश्वमेघनगर राजमंदिर को-आॅप. सोसायटीत भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पित्यानेच कौटुंबिक वादातून केलेल्या गोळीबारात अभिषेक ऊर्फ सोनू नंदकिशोर चिखलकर (२५) व शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) हे दोघे सख्खे भाऊ ठार झाले.उपनगर पोलीस ठाण्यात बीटमार्शल म्हणून कार्यरत असलेले संजय अंबादास भोये, पत्नी मनीषा दोघे सावत्र मुले अभिषेक व शुभम यांच्या समवेत वास्तव्यास आहे. त्याचबरोबर संजय आणि मनीषा यांची मुलगा आणि मुलगीदेखील येथेच राहतात. मुलगा अभिषेक (सोनू) मर्चंट नेव्हीत कामाला होता तर शुभम हा सातपूर येथील खासगी कंपनीत नोकरीला होता. भोये याने मनीषा यांच्याशी विवाहानंतर सावत्र मुलांसोबत राहतात. गेल्या दोन दिवसांपासून सावत्र मुले व भोये यांच्यात वाद झाले होते.शुक्रवारी सकाळी पुन्हा वाद झाले त्यातून शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली होती.  दुपारच्या सुमारास सर्व कुटुंबीय घरात असताना पुन्हा वाद झाले. त्यावेळी संतप्त झालेल्या भोये याने आपल्या ताब्यातील सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून दोघा मुलांवर चार फैरी झाडल्या. यावेळी जीव वाचवताना एकजण बेडरूममध्ये, तर दुसरा बाथरूममध्ये पळाला. मात्र सोनूच्या डोक्यात गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला, तर शुभम जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सोनू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता याठिकाणी पोलिसांना काही रिकामी काडतुसे घटनास्थळी आढळून आली. दरम्यान, दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्यानंतर संशयित भोये याने स्वत: पंचवटी पोलीस ठाण्यात शरण जाऊन घरात रोज होणाऱ्या वादातून संताप अनावर झाल्याने खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल ताब्यात घेतले असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक कैलास पाटील, सुरेश नरवाडे, संदीप शेळके, महेश साळुंके, आदींसह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.महिन्याभरापूर्वीच शुभमचा विवाहपोलीस कर्मचारी संजय भोये याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या दोघा मुलांपैकी शुभम याचा गेल्या महिन्याभरापूर्वीच विवाह झाला होता. शुभम हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. संपत्तीमुळे कौटुंबिक वाद निर्माण होऊन अनेकदा घरात वाद होत होेते. असाच प्रकार शुक्रवारी दुपारी सुरू असताना भोये याला राग अनावर झाल्याने त्याने आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसNashikनाशिक