केबीसीतील तिघांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: July 17, 2014 00:28 IST2014-07-16T23:53:49+5:302014-07-17T00:28:05+5:30
केबीसीतील तिघांना पोलीस कोठडी

केबीसीतील तिघांना पोलीस कोठडी
नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भाऊसाहेब चव्हाणचा भाऊ नानासाहेब चव्हाण, मेव्हणा पोलीस कर्मचारी संजय जगताप तसेच संचालक बापू चव्हाणची पत्नी साधना चव्हाण या तिघांनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़
या प्रकरणात आडगाव पोलिसांनी कंपनीचा संचालक बापू छबू चव्हाण, एजंट व व्यवस्थापक पंकज शिंदे व वाहनचालक नितीन शिंदे या तिघांनाही सोमवारीच अटक केली असून, या तिघांनाही २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे़ या फ सवणूक प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या सहा झाली आहे. आडगाव पोलीस ठाण्यात बुधवारपर्यंत १२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, फ सवणुकीची रक्कम सात कोटींपर्यंत पोहोचली आहे़
नाशिक जिल्ह्णासह मराठवाड्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फ सवणूक करणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेड या कंपनीचे संचालक भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण हे दोघेही कुटुंबासह सिंगापूरला फ रार झाले आहेत़ तसेच केबीसीमध्ये गुंतवणूक केलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका पुष्पलता निकम व सागर निकम या दोघा मायलेकांनी रविवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटनाही घडली आहे़
केबीसीच्या संचालक व एजंटांनी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्णांमध्ये गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करून घेऊन त्यांची फसवणूक केल्याची तसेच काही रक्कम बँकेत ठेवल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे़
दरम्यान, मंगळवारी आडगाव पोलिसांनी साधना चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जगताप व संचालकाचा भाऊ नानासाहेब चव्हाण यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़(प्रतिनिधी)