पोलीस निरीक्षक विसपुते यांचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: September 20, 2016 00:34 IST2016-09-20T00:32:48+5:302016-09-20T00:34:10+5:30
पोलीस निरीक्षक विसपुते यांचा अपघातात मृत्यू

पोलीस निरीक्षक विसपुते यांचा अपघातात मृत्यू
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील आळेफाटा ते चंदनापुरीदरम्यान इनोव्हा व बोलेरोच्या समोरासमोरील अपघातात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय विसपुते यांच्यासह एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १९) सायंकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विसपुते पुण्याहून नाशिककडे आपल्या इनोव्हा (एमएच १५, सीटी ६५४३) कारने येत होते़ डोळासने परिसरात समोरून आलेली बोलेरो (एमएच १६ एजे ६१४६) व इनोव्हाचा समोरासमोर अपघात झाला़.
यामध्ये संजय विसपुते व शाबीरबी पिरमहम्मद शेख (५०, रा़ घारगाव) या दोघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला़
मूळचे नंदुरबार जिल्ह्णातील तळोदा येथील रहिवासी असलेले विसपुते हे पोलीस दलातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा विभागात सुमारे दहा वर्षे कार्यरत होते़ त्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये ते नाशिकला बदली होऊन आले होते़ उपनगर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखा व त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली होती़ गत काही दिवसांपासून रजेवर असलेले विसपुते हे सोमवारी दुपारी पुण्याहून नाशिकला येत असताना सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)