पोलीस उपनिरीक्षक साळी यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:17 IST2017-08-19T23:42:46+5:302017-08-20T00:17:25+5:30

 Police Inspector Seasonal Death Accidental Death | पोलीस उपनिरीक्षक साळी यांचा अपघाती मृत्यू

पोलीस उपनिरीक्षक साळी यांचा अपघाती मृत्यू

आगर टाकळी रस्त्यावर अपघात : सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरतलोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : आगर टाकळी रस्त्यावरील मधुबन लॉन्ससमोर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रमेश नारायण साळी (५२) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़ १९) दुपारच्या सुमारास घडली़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या विठ्ठलनगर कामटवाडा येथील रहिवासी व सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश नारायण साळी (वय ५२) हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिवा (एमएच १५ इझेड ५०४) दुचाकीवरून जेलरोड जुना सायखेडा रोड टाकळीमार्गे मधुबन लॉन्स येथून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या हिरो होंडा पॅशन (एमएच १५ सीए ११०३) वरील चालकाने साळी यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली़ साळी यांच्या नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या अपघातानंतर या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती़ सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांनी साळी यांच्या नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी मिलिंद जगताप यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री नऊ वाजेपर्यंत अपघातग्रस्त हिरो होंडा पॅशनवरील चालकाचा तपास लागलेला नव्हता.

 

Web Title:  Police Inspector Seasonal Death Accidental Death