रुग्णवाहिकांच्या मार्गासाठी पोलिसांचा पुढाकार

By Admin | Updated: September 8, 2016 01:19 IST2016-09-08T01:18:40+5:302016-09-08T01:19:25+5:30

अभिनव उपक्रम : वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी रिक्षांवर लावणार साडेचार हजार पोस्टर्स

Police initiatives for the ambulance route | रुग्णवाहिकांच्या मार्गासाठी पोलिसांचा पुढाकार

रुग्णवाहिकांच्या मार्गासाठी पोलिसांचा पुढाकार

नाशिक : रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास मार्ग देणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे़ रुग्णवाहिकेतील रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने वाहनचालकांनी शक्य तितक्या लवकर आपले वाहन बाजूला घेऊन रुग्णवाहिकेस रस्ता मोकाळा करून देणे गरजेचे आहे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले़ रुग्णवाहिकेसंदर्भात वाहनधारकां-मधील जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या साडेचार हजार फलकांच्या अनावरणप्रसंगी पाटील बोलत होते़
शरणपूर रोडवरील जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयात उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, अपघातग्रस्तांना प्रथम एक तासात वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक असते़ रुग्णवाहिका या अपघातस्थळी जखमींना घेण्यासाठी वा अपघात स्थळावरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करतात़
अपघातातील जखमींचा जीव वाचविण्यासाठी या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता आहे़ एखादी रुग्णवाहिका रिकामी असली तरी ती एखाद्या अत्यवस्थ रुग्णास आणण्यासाठी जात असते़
रुग्णवाहिकेस मार्ग देण्यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे सुमारे ४ हजार ५०० जनजागृतीपर फलक तयार करण्यात आले
असून, ते शहरातील रिक्षाच्या पाठीमागील बाजूस लावण्यात येत आहे. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त रामदास राठोड, पोलीस निरीक्षक शंकर काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले आदिंसह रुग्णवाहिकाचालक, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)‘

Web Title: Police initiatives for the ambulance route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.