सटाण्यात विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन
By Admin | Updated: January 11, 2017 22:41 IST2017-01-11T22:40:47+5:302017-01-11T22:41:10+5:30
शस्त्रास्त्रांची ओळख : प्रगती विद्यालयात शिबिर

सटाण्यात विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन
सटाणा : रेझिंग डे सप्ताहानिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रेझिंग डे सप्ताहानिमित्त मंगळवारी येथील प्रगती विद्यालयात सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना विविध हत्यारांची माहिती दिली. तसेच त्यांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली. दरम्यान, स्पर्धा परीक्षांबाबतही पोलीस उपनिरीक्षक घायवट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शस्त्रास्त्रांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले घायवट यांनी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. याप्रसंगी पोलीस हवालदार अशोक गुंजाळ, रवींद्र भामरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे यांनी केले. यावेळी रामकृष्ण येवला, शिक्षण विस्तार अधिकारी पी. पी. महाजन, मुख्याध्यापक अतुल अमृतकर , के. जी. डोईफोडे , डी. ए. मोरे ,श्रीमती ए. आर. अीहरे, श्रीमती एस. जे. गांगुर्डे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)