शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषधे विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 19:47 IST

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र ब-याच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादकांची फसवणूक : फरफेक्ट कंपनीचा तपास गुंडाळला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र बºयाच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांची काटेकोरपणे काळजी घेतली जात असल्याचे पाहूनच द्राक्षबागांसाठी लागणारी विविध प्रकारची औषधे पुरविणाºया कंपन्या उदयास आल्या असून, त्यात प्रामुख्याने मण्यांची फुगवणी व आकार वाढविण्यासाठी सीपीपीयू व पीजीआर ही औषधे गुणकारी ठरली आहेत. मात्र याच औषधांच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यांची खुलेआम विक्री करण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडला होता. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथे मे. परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या दुकानात व गुदामातून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा बनावट व विनापरवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता. बनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी हात आखडता घेतला. परिणामी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते खुलेआम फिरत आहेत. परंतु शेतकºयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला औषधांचा साठा आरोपींनी कोठून मिळविला, त्यांनी कोठे कोठे त्याची विक्री केली, औषधे तयार करण्यासाठी कच्चा माल कोठून आणला या साºया बाबी गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे कृषी खात्याने कारवाई करूनही निव्वळ पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे द्राक्ष उत्पादकांच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकPoliceपोलिस