Police escorted two men to the sword | तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

मालेगाव : शहरातील संगमेश्वर भागातील डायमंड मिल परिसरात तलवार व गुप्ती असे धारदार शस्त्र बाळगणाºया दोघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील संगमेश्वर भागातील डायमंड मिल परिसरात रेहान उर्फ पन्नादादा अहमद (१८), सोहेल अहमद तोफेल अहमद (२२) दोघे रा. संगमेश्वर या दोघांकडे तलवार व गुप्ती असे घातक शस्त्र आढळून आले आहे. दोघा संशयित आरोपींना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सदर हत्यारे हद्दपार गुन्हेगार उबेद समसुद्दीन अन्सारी याने ठेवायला दिले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे, पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पोलीस हवालदार अविनाश राठोड, नरेंद्रकुमार कोळी, नितीन बाराहाते, पंकज भोये, संजय पाटील, संदिप राठोड आदिंनी ही कारवाई केली.


Web Title: Police escorted two men to the sword
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.