पोलीस बंदोबस्तात अतिक्र मणे हटविली

By Admin | Updated: May 20, 2017 01:00 IST2017-05-20T01:00:10+5:302017-05-20T01:00:22+5:30

सायखेडा : सिन्नर-मांजरगाव रस्त्याचे काम सध्या सुरू असून, सायखेडा गावातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचा विळखा पडला होता.

Police encroached on the wall | पोलीस बंदोबस्तात अतिक्र मणे हटविली

पोलीस बंदोबस्तात अतिक्र मणे हटविली

 लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : सिन्नर-मांजरगाव रस्त्याचे काम सध्या सुरू असून, सायखेडा गावातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचा विळखा पडला होता. ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, भूमिअभिलेख यांच्यामार्फत रस्त्याच्या कडेला येणाऱ्या अतिक्र मणधारकांना अनेक वेळा नोटिसा देऊन अतिक्र मण काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र दुकानदारांच्या विरोधामुळे अतिक्रमणे हटत नव्हती. मात्र भूमिअभिलेख आणि ग्रामपंचायत यांनी कारवाईची अखेरची नोटीस देऊन काल सायखेडा पोलीस व सीआरपी जवान यांच्या बंदोबस्तात अतिक्र मणे हटविण्यास सुरुवात केली. यावेळी सार्वजानिक विभागाचे कर्मचारी महेश पाटील, गजबी, सर्कल कारवाल, ग्रामविकास अधिकारी पी. ए. माळी, सायखेड्याच्या सरपंच गीतांजली जितेंद्र कुटे, उपसरपंच गणेश कातकाडे, सायखेड्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केदारे आदी उपस्थित होते.
सायखेडा येथील अतिक्र मणांचा मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे हा मेनरोड छोटा झाला आहे. सध्या सायखेडा-मांजरगाव रस्त्याचे काम सुरू असल्याने सायखेडा येथील मेनरोडवर येणाऱ्या अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीने नोटिसा बजावत आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. परंतु काही व्यावसायिकांनी अतिक्रमण काढले नसल्याने ही अतिक्रमणे काल बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीमार्फत संयुक्त मोहीम राबवून हटविण्यात आली.
सायखेडा हे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने नेहमीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र ट्रॅफिक जाममुळे सर्वांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. सायखेडा मेनरोडवर अतिक्रमणधारकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्र मणे लवकरात लवकर काढून टाकावे अशी अनेक दिवसांची मागणी आज अखेर पूर्ण झाली.
बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम संबंधितांकडून हाती घेण्यात आली. सिन्नरकडून सायखेडा गावातून करंजगावकडे जाणारा हा रस्ता पूर्वीपासूनच आजतागायत आहे तसाच आहे. या रस्त्याच्या कडेला व्यावसायिकांनी केलेली अतिक्र मणे काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

Web Title: Police encroached on the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.