‘त्या’ २९ कामगारांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: July 6, 2016 21:37 IST2016-07-06T21:37:44+5:302016-07-06T21:37:44+5:30
सहकारी कामगाराचा मृत्यूनंतर त्याच्या वारसांना योग्य मोबदला दिला जावा, या मागणीसाठी संतप्त कामगारांनी कंपनी कार्यालयाची तोडफोड करीत पोलिसांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी

‘त्या’ २९ कामगारांना पोलीस कोठडी
नाशिक : सहकारी कामगाराचा मृत्यूनंतर त्याच्या वारसांना योग्य मोबदला दिला जावा, या मागणीसाठी संतप्त कामगारांनी कंपनी कार्यालयाची तोडफोड करीत पोलिसांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी २९ कामगारांना अटक केली. त्यांना सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शापूरजी पालनजी कंपनीत उंचावरील चिमणीवर काम करीत असतांना त्यावरुन पडून मध्यप्रदेश राज्यातील लखन उदयभान आहेरबार (२३) या तरुण कामगाराचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी सहकारी कामगारांनी त्याच्या वारसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी बोलणी सुरु केली होती. याचवेळी शंभर ते दीडशे कामगारांनी कंपनी कार्यालयावर हल्ला करुन यंत्रसामुग्री व साहित्याची मोडतोड केली होती. त्यात कंपनीच्या वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी २९ परप्रांतिय कामगारांना अटक करुन बुधवारी सिन्नर न्यायालयात हजर केले. या २९ कामगारांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलीस संशयित हल्लेखोर फरार परप्रांतिय कामगारांचा शोध घेत आहेत.