शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सहा संशयित गुंडांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:11 IST

दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान दहा ते पंधरा संशयित गुंडांनी साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेप्रकरणी या गुन्ह्यातील सहा संशयित गुंडांना रविवारी (दि.१२) तालुका पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आले.

ठळक मुद्देफार्महाउस लैंगिक छळ प्रकरण : आणखी एका संशयिताला बेड्या

नाशिक : दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान दहा ते पंधरा संशयित गुंडांनी साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेप्रकरणी या गुन्ह्यातील सहा संशयित गुंडांना रविवारी (दि.१२) तालुका पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आले. एकूण सात संशयितांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून, मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगार संदेश काजळे हा अद्याप फरार आहे.फार्महाउसवर मद्यसेवन करून दोघा तरुणांना अमानुष मारहाण करत अनैसर्गिक अत्याचाराची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलीस दल हलले. तपासाला गती देत पोलिसांनी या गुन्ह्यात सहा संशयितांना शनिवारी रात्री उशिरापर्यंत अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.संशयित प्रीतेश काजळे, संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भवाळकर, निखिल महेंद्र पवार यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तसेच रविवारी सातवा संशयित प्रकाश बाळू वाघ (रा. शुभम पार्क) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुंडांच्या टोळीविरुद्ध विविध कलमान्वये दाखल करण्यात आले आहे. मुख्य सूत्रधारासह उर्वरित सहा ते सात संशयित गुंडांचा पोलीस शोध घेत आहेत.दरी शिवारात निखिल पवार याच्या फार्महाउसवर गुरु वारी (दि.९) रात्रभर ओल्या पार्टीचा धिंगाणा चालला होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.दोघा तरुणांनी नियमानुसार रात्री दहा वाजता डीजे बंद केल्यानंतर पंधरा संशयित गुंडांच्या टोळीने त्यांना विवस्त्र करून शरीरावर थंड पाणी टाकत पट्ट्याने अमानुष मारहाण तसेच विजेचे शॉकदेखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघा पीडित तरुणांनी आपली कशीबशी गुंडांच्या तावडीतून शुक्र वारी (दि.१०) सकाळी सुटका करून घेतली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी