शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपआयुक्तांच्या व्हायरल पत्राने अज्ञान उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:00 IST

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी हेच जिल्ह्याचे ‘जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी’ असतात व उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतात हे पोलीस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला ठावूक नसावे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. तथापि, नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तांना याची खबरच नाही.

ठळक मुद्देपत्रव्यवहार : जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांविषयी अनभिज्ञ

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी हेच जिल्ह्याचे ‘जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी’ असतात व उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतात हे पोलीस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला ठावूक नसावे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. तथापि, नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तांना याची खबरच नाही.गेल्या दोन दिवसांपासून पोलीस महासंचालकांना नाशिक लोकसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून माहिती पाठविताना त्यांच्याकडून ‘निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नाशिक’असा उल्लेख केला जात आहे. पोलीस उपआयुक्तांच्या या अज्ञानाची चर्चा महसूल खात्यात चांगलीच रंगली असून, सदर पत्र सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल केले जात आहे.लोकसभेच्या निवडणुका निष्पक्ष व निर्भिड वातावरणात पार पाडण्याची मुख्य जाबबदारी पोलीस यंत्रणेवर असून, त्यासाठी गुन्हेगार, समाजकंटकांवर दैनंदिन केली जाणारी कारवाईची माहिती पोलीस महासंचालकांना त्याचबरोबर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्याकडून दररोज सदरची महिती पोलीस महासंचालकांना दिली जात असून, त्याची प्रत मात्र ‘निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी’ या नावाने केला जात आहे. मुळात जिल्हाधिकारी हे ‘जिल्हा निवडणूक अधिकारी’ आहेत, शिवाय त्यांना प्रत माहितीसाठी पाठवितांना उपआयुक्त दर्जाच्या या अधिकाºयांकडून ‘माननीय, महोदय’ या वरिष्ठ अधिकाºयांच्या राजशिष्टाचाराला धरून पत्रात वापरले जाणारे विशेषण लावणेदेखील कमीपणाचे वाटत असल्याचे सदर पत्रातून व्यक्त होत असल्याचे मत महसूल अधिकारी व्यक्त करीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी स्वत: पोलीस आयुक्तांना भेटून आल्यानंतर राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूने दावे, प्रतिदावे केले जात असताना कदाचित त्याचमुळे पोलीस उपआयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना गृहीत धरले असावे, असा प्रतिवाद महसूल अधिकारी करीत आहेत.दुय्यम स्थान देण्याचा प्रकारमुळात निवडणूक विषयक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्हा निवडणूक अधिकाºयांशी निकटचा प्रश्न असून, त्यांना थेट पत्र व्यवहार करण्याऐवजी पोलीस महासंचालकांना प्राधान्य देऊन जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दुय्यम स्थान देण्याचा प्रकारही औचित्याला धरून नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. स्वत: उपआयुक्तांच्या स्वाक्षरीनिशी हा अहवाल सादर होत असल्याने त्याची माहिती पोलीस आयुक्तांना आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसElectionनिवडणूक