रस्ता लूट करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:14 IST2020-12-06T04:14:40+5:302020-12-06T04:14:40+5:30

मोहम्मद इरशाद अल्लाउद्दीन सोमवारी सायंकाळी कामावरून परत येत असताना महामार्गावरील म्हाळदे पुलाखाली फैजान इलियास याने त्यांना अडवून तलवारीचा धाक ...

Police custody for two robbers | रस्ता लूट करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

रस्ता लूट करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

मोहम्मद इरशाद अल्लाउद्दीन सोमवारी सायंकाळी कामावरून परत येत असताना महामार्गावरील म्हाळदे पुलाखाली फैजान इलियास याने त्यांना अडवून तलवारीचा धाक दाखवून खिशातून ३ हजार २०० रुपये बळजबरीने काढून घेतले. त्याचा प्रतिकार केला असता झटापट करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. यावेळी आरडाओरड केल्याने कारखान्यातील कामगार व महिलांनी धाव घेत जखमी इरशादला रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शेख लईक शेख अतिक (२८), फैजान खान इलियास खान (२५, दोघे, रा. गुलशेरनगर) यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. शनिवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उगले हे करीत आहेत.

Web Title: Police custody for two robbers