खंडणी प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: September 8, 2016 01:36 IST2016-09-08T01:36:27+5:302016-09-08T01:36:38+5:30

खंडणी प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

Police custody of two in the ransom case | खंडणी प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

खंडणी प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

 नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर पेगलवाडी येथील देवबाप्पा माऊली धाम ट्रस्टचे अध्यक्ष फरशीवाले बाबा यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
देवबाप्पा माउली धाम ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ तुकाराम जाधव उर्फ फरशीवालेबाबा यांच्याकडे संजय शेजवळ यांने तुमच्याकडे बोगस डॉक्टर आहे, तुमच्या ट्रस्टचे अनधिकृत बांधकाम आहे याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती. त्यानंतर फरशीवाले बाबा यांच्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी करून तडजोडीपोटी ११ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यापोटी ५० हजाराची रक्कम फरशीवालेबाबा यांचा मुलगा संदीप याच्याकडून स्वीकारताना सोमवारी सायंकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर साधू, भाविक असे वेशांतर करून आलेल्या पोलिसांनी संजय सुकदेव शेजवळ रा. भालेराव मळा जयभवानी रोड व भाऊसाहेब लक्ष्मण मुंढे रा. माडसांगवी या दोघांना रंगेहाथ अटक केली होती. संशयित शेजवळ व मुंढे याला नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संशयितांचे आणखीन कोण साथीदार यामध्ये गुंतले आहेत यांचा पोलीस शोध घेत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police custody of two in the ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.