लहाडेला २ मेपर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: April 29, 2017 02:28 IST2017-04-29T02:27:56+5:302017-04-29T02:28:13+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे या शुक्रवारी (दि़२८) पोलिसांना शरण आल्या़

लहाडेला २ मेपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे या शुक्रवारी (दि़२८) सरकारवाडा पोलिसांना शरण आल्या़ जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरती एम. शिंदे यांच्या न्यायालयात लहाडे यांना हजर केले असता २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लहाडे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि़२७) न्यायालयात झालेल्या इनकॅमेरा सुनावणीत अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला़ तसेच शुक्रवारी पोलिसांत हजर होण्याची लेखी हमी दिली होती़
जिल्हा शासकीय रुग्णालयात २२ मार्च रोजी पिंपळगाव बसवंतजवळील सीमा शेजवळ या २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचे घटना उघडकीस आली़ या प्रकरणात महापालिका, आरोग्य उपसंचालक तसेच अतिरिक्त आरोग्य सहसंचालकांनी केलेल्या चौकशीत डॉ़ वर्षा लहाडे या दोषी आढळून आल्याने आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले़