खंडणी प्रकरणातील तिघा संशयितांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 15, 2014 23:55 IST2014-05-15T23:45:50+5:302014-05-15T23:55:07+5:30
नाशिक : सराईत गुन्हेगार अर्जुन पगारे, भीम पगारे, गिरीश शेी यांना ठार न मारण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सावंत, पवार, जगताप या तिघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़

खंडणी प्रकरणातील तिघा संशयितांना पोलीस कोठडी
नाशिक : सराईत गुन्हेगार अर्जुन पगारे, भीम पगारे, गिरीश शेी यांना ठार न मारण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सावंत, पवार, जगताप या तिघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, घारपुरे घाटावरील गोदावरीनगर येथे राहणारे हरीश प्रभाकर गांगुर्डे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री या तिघांविरुद्ध फि र्याद दिली़ या फि र्यादीनुसार भीम पगारेचा खून झाला त्यादिवशी रात्री साडेदहा वाजता संशयित गणेश चांगले, महेश सावंत, सागर पवार, सचिन जगताप व इतर पाच ते सहा साथीदार स्विफ्ट कार व रिक्षातून आले़ गांगुर्डे यांच्या मामाची मुले भीम व अर्जुन पगारे यांना ठार न मारण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली़ तसेच पैसे न दिल्यास पगारे कुटुंबीयांचा खून करण्याची धमकी दिली़
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री खंडणी प्रकरणातील संशयित महेश सावंत, सागर पवार, सचिन जगताप यांना अटक केली़ या तिघांनाही आज न्यायालयात हजर केले असता इतर साथीदारांचा तपास करणे, स्विफ्ट कार व रिक्षा यांचा तपास, तसेच भीम पगारे हत्त्येशी असलेला संबंध शोधून काढण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने या तीनही संशयितांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)