खंडणीतील चौदा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

By Admin | Updated: May 20, 2014 00:16 IST2014-05-19T23:51:17+5:302014-05-20T00:16:21+5:30

नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या १४ संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २३ मेपर्यंत वाढ केली आहे़ खंडणी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २८ संशयितांना अटक केली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पगारेच्या हत्त्येपूर्वी त्याने साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केली होती़ व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी सोमवारी १४ संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती़ त्यातील संशयित मनोज किशोर वाघ, अश्पाक फ किम मणियार, रवींद्र नारायण आवटे, सचिन रवींद्र पगारे, नंदन पाईकराव, जितेंद्र अशोक चौधरी, पंकज भाऊसाहेब भांबळे, संदीप गोपीचंद दोंदे, संतोष जीवन भुजबळ, सोहेल रफि क शेख, आनंद गुरुबच्चीतसिंग घडवाल, योगेश अशोक गांगुर्डे, विशाल विलास मैड, अरि

Police custody of fourteen suspects in the ransom | खंडणीतील चौदा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

खंडणीतील चौदा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या १४ संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २३ मेपर्यंत वाढ केली आहे़ खंडणी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २८ संशयितांना अटक केली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पगारेच्या हत्त्येपूर्वी त्याने साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केली होती़ व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी सोमवारी १४ संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती़ त्यातील संशयित मनोज किशोर वाघ, अश्पाक फ किम मणियार, रवींद्र नारायण आवटे, सचिन रवींद्र पगारे, नंदन पाईकराव, जितेंद्र अशोक चौधरी, पंकज भाऊसाहेब भांबळे, संदीप गोपीचंद दोंदे, संतोष जीवन भुजबळ, सोहेल रफि क शेख, आनंद गुरुबच्चीतसिंग घडवाल, योगेश अशोक गांगुर्डे, विशाल विलास मैड, अरिफ लियाकत पठाण या संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली़ त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police custody of fourteen suspects in the ransom