खून प्रकरणी पोलीस कोठडी
By Admin | Updated: June 19, 2015 23:48 IST2015-06-19T23:48:30+5:302015-06-19T23:48:55+5:30
खून प्रकरणी पोलीस कोठडी

खून प्रकरणी पोलीस कोठडी
पंचवटी : पतीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीला जिवंत जाळून तिचा खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या रविवारी हिरावाडीतील शक्तिनगर परिसरात राहणाऱ्या अरुणा जितेंद्र जाधव या विवाहितेवर पती जितेंद्र जाधव याने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली होती. या घटनेत अरुणा जाधव ही गंभीर जखमी भाजल्याने तिला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.