अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:19 IST2021-08-14T04:19:01+5:302021-08-14T04:19:01+5:30

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत अवैधरीत्या देशी दारू विकणाऱ्यांकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल ...

Police crackdown on illegal liquor dealers | अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत अवैधरीत्या देशी दारू विकणाऱ्यांकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील विजय नगर बस स्टॉपजवळ सागर चंद्रकांत घुगे (२९, मोरवाडी गाव, मारुती मंदिराजवळ ) हा अवैधरीत्या देशी दारूची मद्यविक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्याच्यावर कारवाई करीत पोलिसांनी देशी दारूच्या ५१ बाटल्या असा २७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दत्त चौक येथील भाजीमार्केटमधील दुसऱ्या घटनेत पोलिसांनी रवींद्र देवचंद शितोळे (३३, रा. दत्त चौक भाजी मार्केट ) यालाही अवैधरीत्या देशी दारूची विक्री करताना पकडले आहे. पोलिसांनी छापा मारून सुमारे ११ हजार ८५० रुपयांच्या ३१९ लहान व मोठ्या बाटल्या जप्त करून त्याच्यावर कारवाई केली.

130821\13nsk_30_13082021_13.jpg

जप्त केलली देशी दारू

Web Title: Police crackdown on illegal liquor dealers