पोलीस सहआयुक्त शालिग्राम पाटील यांचं निधन
By Admin | Updated: October 23, 2016 11:11 IST2016-10-23T11:11:01+5:302016-10-23T11:11:01+5:30
नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त शालिग्राम पाटील यांचे आज सकाळी पोहताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले

पोलीस सहआयुक्त शालिग्राम पाटील यांचं निधन
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 23 - नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त शालिग्राम पाटील यांचे आज सकाळी पोहताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. सावरकर जलतरण तलावावर आज सकाळी साडेसात वाजता ते पोहण्यासाठी गेल्यावर ही दुर्घटना घडली. 1982च्या बॅचचे असलेले पाटील हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नाशिकमध्ये बदली झाली होती. पोलीस प्रशासनाची उत्कृष्टरीत्या ते जबाबदारी पार पाडत होते. येत्या मे महिन्यात ते सेवानिवृत्तही होणार होते. मात्र सेवानिवृत्त होण्याआधीच काळानं त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यानं नाशिकवर शोककळा पसरली आहे.