शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांकडून तक्रारदाराची विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:20 IST

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली.

इंदिरानगर : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली.बुधवार (दि १९) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वत: वाहन चालवित इंदिरानगर पोलीस ठाण्यात सरप्राइज व्हिजीट दिली. पोलीस आयुक्त आल्याचे पाहून पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यात येताच स्वच्छता बघून समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी तेथे तक्रार देण्यासाठी आलेल्या युवतीला जवळ बोलावून ‘काय झाले.. कुठे झाले.. घाबरू नको मला सांग, तुझी तक्रार घेतली’ अशी विचारपूस केली. सदर युवतीने झालेली घटना कथन केली व माझी तक्रार घेतली असल्याचे सांगितले.यावेळी ठाणे अंमलदाराच्या खुर्चीवर गणवेश परिधान करून बसलेल्या महिला पोलीस कर्मचारी व्ही. एस. पाचोरे यांना आयुक्त म्हणाले ‘तुम्ही ज्येष्ठ असूनसुद्धा गणवेश परिधान केला आहे, कारण ज्येष्ठ महिला साडीवर असतात, मला बरे वाटले’ असे म्हणून पाचोरे यांना बक्षीस जाहीर केले.सुमारे पंधरा मिनिटांत भेट दिल्यानंतर बीट मार्शल यांना समवेत घेऊन परिसरातील सुमारे ४० क्यूआर कोडची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय