पगारे हत्त्या प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: May 11, 2014 22:19 IST2014-05-11T21:43:51+5:302014-05-11T22:19:36+5:30

नाशिक : मल्हारखाण झोपडप˜ीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे या दोन संशयितांना अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ दरम्यान, यातील पाच संशयित अद्यापही फ रार आहेत़

Police closet suspects in Pagare murder case | पगारे हत्त्या प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी

पगारे हत्त्या प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी

नाशिक : मल्हारखाण झोपडप˜ीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे या दोन संशयितांना अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ दरम्यान, यातील पाच संशयित अद्यापही फ रार आहेत़
शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेला, तसेच शहरातून तडीपार करण्यात आलेल्या भीम पगारेची शुक्रवारी रात्री गोळी मारून, तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्त्या करण्यात आली़ संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे, रामदास चांगले, शरद मारुती चांगले, गणेश बाळासाहेब चांगले यांनी हत्त्या केल्याची फि र्याद मोनिका काळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे़
या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश शेवरे (३३) व मंगेश शेवरे (३२, दोघेही रा़ नेहरू टॉवर, अशोकनगररोड, सातपूर) या दोघा संशयितांना अटक केली़ या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता या हत्त्येमागील उद्देश, गुन्‘ात वापरलेले हत्यार तसेच फ रार आरोपींच्या शोधासाठी पोलीस कोठडीची मागणी केली़ पोलिसांच्या मागणीनुसार न्यायाधीश श्रीमती एऩ एऩ भालेराव यांनी संशयितांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, या हत्त्या प्रकरणातील पाच संशयित फ रार असून, त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़(प्रतिनिधी)
--इन्फ ो--
पगारे हत्त्येचा शोध सुरू
सराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फि र्यादीनुसार आम्ही संशयितांचा शोध घेतच आहोत़ यातील दोघांना अटकही करण्यात आली असून, अजून पाच संशयितांचा शोध सुरू आहे़ मयत पगारे याचे अनेक शत्रू असल्याने या हत्त्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे़
- संदीप दिवाण, पोलीस उपआयुक्त

फ ोटो :- ११ पीएचएमए ७४
पगारे हत्त्या प्रकरणातील संशयित नीलेश शेवरे व मंगेश शेवरे यांना न्यायालयात नेताना पोलीस कर्मचारी़

Web Title: Police closet suspects in Pagare murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.