विनयभंग प्रकरणी पोलीस कोठडी
By Admin | Updated: June 15, 2015 23:54 IST2015-06-15T23:53:54+5:302015-06-15T23:54:23+5:30
विनयभंग प्रकरणी पोलीस कोठडी

विनयभंग प्रकरणी पोलीस कोठडी
नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयितास जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके जोशी यांनी १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा संशयित सागर मनोज सारवान हा दोन वर्षांपासून पाठलाग करून छेड काढीत होता़ रविवारी ही मुलगी दूधबाजारातून जात असताना संशयित सारवान याने तिचा विनयभंग केला़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती़ (प्रतिनिधी)