हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: September 8, 2016 01:34 IST2016-09-08T01:33:53+5:302016-09-08T01:34:05+5:30

हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना पोलीस कोठडी

Police closet to directors of House of Investment | हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना पोलीस कोठडी

हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना पोलीस कोठडी

नाशिक : गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या पाच संचालकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि़ ७) १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, कंपनीचा प्रमुख संचालक विनोद पाटील व सहा संचालक अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूकदार गणेश देसाई यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात कंपनीच्या अकरा संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ संशयितांमध्ये विनोद पाटील, भगवंत कोठुळे (रा. तपोवन), अनिल निवृत्ती कोठुळे (रा. सिडको), महेश सुधाकर नेरकर (रा. सिडको), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), सतीश शेषराव कामे (रा. सिडको), विजय लक्ष्मण खुनकर, सुशांत रमेश कोठुळे (रा. तपोवन), सुरेखा भगवंत कोठुळे (रा. जेजूरकर मळा, तपोवन) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police closet to directors of House of Investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.