शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पोलिसांची नाकाबंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:18 IST

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण्याबरोबरच काहींना लाठीचा प्रसाद देण्याची कारवाईही करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खºया अर्थाने संचारबंदीचा प्रत्यय आला आहे.

ठळक मुद्दे रस्ते, चौक बंद : विनाकारण गर्दी करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद

नाशिक : राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण्याबरोबरच काहींना लाठीचा प्रसाद देण्याची कारवाईही करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खºया अर्थाने संचारबंदीचा प्रत्यय आला आहे.रविवारी जनता संचारबंदीच्या काळात स्वत:ला घरात कोंडून घेणाºया नागरिकांनी मात्र सायंकाळनंतर घराबाहेर पडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याऐवजी त्याविषयी बेफिकिरीचे प्रदर्शन घडविले. सोमवारीदेखील हजारो नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते. सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी वाहनांतून तर काहींनी पायीच गंमत पाहण्यासाठी घराबाहेर पडले. सरकारने फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची अनुमती दिलेली असताना ते बंधन झुगारून अनेकांनी आपापली दुकाने उघडून ग्राहकांना प्रोत्साहित केले होते. हजारोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे रस्त्यावर उतरल्याने आरोग्य यंत्रणेने भीती व्यक्तकेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता, घरातच थांबणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी स्वत:बरोबरच अन्य लोकांचाही जीव धोक्यात घालणे सुरू केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळनंतर संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली. त्यामुळे रात्रीपासूनच पोलिसांना रस्त्यावर उतरून गर्दीला आवर घालण्याची कार्यवाही करावी लागली. शहरातील प्रमुख रस्ते, चौकाचौकांत लोखंडी बॅरिकेट््स टाकून थेट रस्तेच बंद करून पोलिसांनी रस्त्याचा ताबा घेतला. मंगळवारी सकाळी याचा फटका अनेकांना बसला. दूध, भाजीपाला विक्रेत्यांना त्यातून वगळण्यात आले मात्र अन्य व्यक्ंितना पोलिसांनी अटकाव केला. शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड, सातपूर, पाथर्डी, अंबड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, महात्मा गांधीरोड, गोदाघाट आदी भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात संचारबंदीची परिस्थिती दिसून आली, तर याच वेळी विनाकारण फिरणाºयांना पोलिसांनी हिसकादेखील दाखविला.जीवनावश्यकवस्तू मुबलककोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी, जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाने भाजीपाला, दूध, फळे, औषधे दुकानांना त्यातून वगळल्याने नागरिकांचे हाल टळण्यास मदत झाली. मंगळवारी शहर, परिसरात अन्य दुकाने पूर्णपणे बंद असली तरी, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी होती व त्यात मुबलक साठादेखील होता. त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस