पोलिसांकडून मारहाण

By Admin | Updated: July 28, 2016 00:50 IST2016-07-28T00:44:57+5:302016-07-28T00:50:46+5:30

पोलिसांकडून मारहाण

The police beat up | पोलिसांकडून मारहाण

पोलिसांकडून मारहाण

पंचवटी : अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखलनाशिक : दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना एका नागरिकास मध्यरात्री घरातून उठवून पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात नेत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधिताने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, हवालदार बी. के. गवळी, म्हसदे, मोतीराम चव्हाण यांनी फिर्यादी शरद कमलाकर लोखंडे (२८, भराडवाडी) यास व त्याचा भाऊ प्रेम मोहन शिंदे यास झोपेतून उठविले. जबरदस्तीने पोलीस वाहनामध्ये डांबून पोलीस ठाण्यात आणले आणि मारहाण केली. तसेच खिशामधील वीस हजार रुपयांची रोख रक्कमही काढून घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी फिर्यादी शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The police beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.