कागदपत्रे सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदतवाढ
By Admin | Updated: August 8, 2014 01:05 IST2014-08-08T00:44:59+5:302014-08-08T01:05:50+5:30
कागदपत्रे सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदतवाढ

कागदपत्रे सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदतवाढ
नाशिक : केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण, त्याची पत्नी आरती चव्हाण व इतर संशयितांचे अटक वॉरंट, या प्रकरणात अटक केलेल्या सर्व संशयितांची बँक लॉकर तपासणी, तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिक मुदतवाढ देण्याची मागणी पोलिसांनी आज न्यायालयाकडे केली़
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांच्याकडे आज केबीसीबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व इतर आरोपींच्या गोठवलेल्या खात्यातून व्यवहार होत आहेत अथवा नाही़ तसेच सध्या खात्यांच्या परिस्थितीबाबत बँकांकडून माहिती घेतली का? अशी विचारणा केली़ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत बँकेला खाते गोठविण्यासाठी पत्रव्यवहार केला असून, व्यवहाराबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले़ चव्हाण याचे अटक वॉरंट, पासपोर्ट, अटक केलेल्या आठ संशयितांची बँक लॉकर तपासणी व इतर कागदपत्रे सादर करण्यास मुदत वाढवून मिळण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे़ जिल्हा सरकारी वकील अॅड़ श्रीधर माने यांनी याबाबत युक्तिवाद केला़(प्रतिनिधी)