खंडणी मागणाºया तोतया पोलिसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:20 IST2017-09-25T01:20:49+5:302017-09-25T01:20:53+5:30
मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरातील दूध डेअरीच्या चालकास वेश्या व्यवसाय करीत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया दोघा तोतया पोलिसांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

खंडणी मागणाºया तोतया पोलिसांना अटक
पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरातील दूध डेअरीच्या चालकास वेश्या व्यवसाय करीत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया दोघा तोतया पोलिसांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरातील संतोष खैरे यांची परिसरात दूध डेअरी आहे़ गत आठवड्यात संशयित तोतया महिला पोलीस अधिकारी प्रतिभा भुजबळ, पेठरोडवरील आकाश जाधव, सिडको रायगड चौकातील शुभम दहिवाल व त्यांच्या अन्य साथीदारांनी खैरेकडे आले़ त्यांनी आम्ही ठाण्याचे पोलीस आहोत, तुमच्या खोलीत राहणाºया मुली वेश्या व्यवसाय करतात, कारवाई टाळायची असेल तर सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तर संशयित प्रतिभा भुजबळ या महिलेने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून खैरे याला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली होती़ डेअरीचालक खैरे यांना या पोलिसांबाबत संशय आल्याने त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून सविस्तर माहिती दिली़ त्यानंतर तोतया महिला पोलीस उपनिरीक्षक भुजबळ हिस फोन करून पैसे देण्याचे कारण सांगून बोलावून घेतले़ पंचवटी पोलिसांनी सापळा रचून या तोतया अधिकाºयास ताब्यात घेतले होते़ उर्वरित संशयित जाधव व दहिवाल या दोघांना रविवारी पोलिसांनी अटक केली़