ट्रक चालकांना मारहाण करुन लूटणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:59 PM2020-08-27T17:59:49+5:302020-08-27T18:03:22+5:30

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली.

Police arrest two truck drivers | ट्रक चालकांना मारहाण करुन लूटणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

ट्रक चालकांना मारहाण करुन लूटणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देआरोपींकडून महामार्गावरील रॉबरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली.
मुंबई आग्रा महामार्गावर मंगळवारी (दि.२५) तळेगाव शिवारात मध्य प्रदेशातील कंटेनर चालक फिरोज रसूल खान याने कंटेनर रस्त्यालगत लावून काच पुसत असतांना दुचाकीवर आलेल्या ३ अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम व ३ मोबाईल जबरीने चोरून नेले. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळविलेल्या माहितीच्या आधारे तळेगाव ता. इगतपुरी व कसारा ता. शहापूर येथून २आरोपिंना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला आहे.
या लूट प्रकरणी किशोर संजय मनोहर (२१), दिपक सखाराम जाधव (२१, रा तळेगाव, ता. इगतपुरी) या दोघांना अटक केली आहे. महामार्गावरील सतत होणाºया चोºया व लूट प्रकरणात यातील आरोपी दिपक जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्यांचेविरु द्ध कसारा पोलिस स्टेशनला जबरी चोरी तसेच रेल्वे इगतपुरी पोलीस ठाणेस दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपींकडून महामार्गावरील रॉबरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक शिर्मष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलिस निरिक्षक अनिल वाघ, सहायक पोलिस उपनिरिक्षक नवनाथ गुरु ळे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, संदीप हांडगे, सचिन पिंगळ, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबीले, गणेश वराडे, विनोद गोसावी यांच्या पथकाने घटनेचा गुन्हा नोंद होताच १२ तासात आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. 

Web Title: Police arrest two truck drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.