बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई
By Admin | Updated: December 1, 2015 22:32 IST2015-12-01T22:26:46+5:302015-12-01T22:32:00+5:30
बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई

बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई
नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शहरात विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे़
या विशेष मोहिमेमध्ये सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनाच्या फाळक्यावरून मालाची वाहतूक करणे, रेती, दगड, वाळू रस्त्यावर सांडेल अशी वाहतूक करणे, सीटबेल्ट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, नियमापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, फुटपाथवर वाहन उभे करणे, प्रवेश बंद मार्गाने वाहन चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे़ ही मोहीम संपूर्ण नाशिक शहरात राबविली जाणार असून, यामध्ये शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्तप्रशांत वाघुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागवान, कांबळे, पोलीस निरीक्षक गाडे, डाबेराव, सहायक पोलीस निरीक्षक कदम, सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक पालकर यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)