शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:28 IST

गोदावरी व गिरणा नदीतून वारेमाप केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल खात्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले असले तरी, दिवसाढवळ्या उघडपणे चालणाºया गौणखनिजाच्या चोरीच्या विरोधात मात्र पोलीस यंत्रणेने कडक पावले उचलली आहेत.

नाशिक : गोदावरी व गिरणा नदीतून वारेमाप केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल खात्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले असले तरी, दिवसाढवळ्या उघडपणे चालणाºया गौणखनिजाच्या चोरीच्या विरोधात मात्र पोलीस यंत्रणेने कडक पावले उचलली आहेत. मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वाळूचोरीचे वृत्त प्रसिद्ध होताच मालेगाव तालुक्यात वाळूचे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील वाळूची पंचक्रोशीत चर्चा होत असून, येथील वाळूची वाहतूक कोणीही अडवू शकत नाही,  असा छातीठोक दावा वाळू विक्रेत्यांकडून केला जात असल्याने वाळूची मागणी वाढली आहे.सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी पात्रातून वाळूचा होत असलेला वारेमाप उपसा रोखण्याचे कोणतेही प्रयत्न महसूल व पोलीस खात्याकडून केले जात नसल्याचे पाहून येथील वाळूची मागणी वाढली आहे. दिवसातून शंभरेक मालट्रक वाळूची या भागातून वाहतूक होत असताना त्यासाठी कोणताही वाहतूक परवान्याची अट घालण्यात आलेली नाही. त्यातच वाळू विक्रेत्यांकडून सरसकट सिन्नर तालुक्यात कोठेही वाळूची वाहतूक करण्यात अडचण नसल्याची हमी दिली जात असल्यामुळे निर्धोेक वाहतूक केली जात आहे. दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातूनही बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असताना त्याकडेही महसूल खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर मालेगावचे अपर पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने सोमवारी रात्री लेंडाणे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले आहेत. एकूणच वाळूच्या बेकायदेशीर वाहतुकीबद्दल महसूल खात्याची कारवाई दुटप्पी दिसत असून, किरकोळ वाहतूक करणाºयांना हिसका दाखविण्यासाठी सरसावणारे हात मात्र गोदावरीतील वाळू चोरी रोखण्यात थिटे पडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसsandवाळूNashikनाशिक