दिंडोरीत सामाजिक संघटनांनी बुजवले खड्डे
By Admin | Updated: July 26, 2016 22:18 IST2016-07-26T22:18:27+5:302016-07-26T22:18:27+5:30
दिंडोरीत सामाजिक संघटनांनी बुजवले खड्डे

दिंडोरीत सामाजिक संघटनांनी बुजवले खड्डे
दिंडोरी : ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्र मांतर्गत जय महाराष्ट्र मित्रमंडळ व साईश्रद्धा ग्रुप दिंडोरी यांच्या वतीने सामाजिक उपक्र म राबवून रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक उपक्र म राबविण्यात आला.
यावेळी अमोल उगले, अमोल मवाळ, प्रीतम शेटे, गुलाब जाधव, दिनेश शिंदे, विजू पाडेकर, भूषण जाधव, प्रशांत गायकवाड आदि उपस्थित होते. दिंडोरीतील काही प्रमुख रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठी अडचण होऊन खड्डे टाळताना छोटे-मोठे अपघात होत असतात. हीच गोष्ट हेरत जय महाराष्ट्र मित्रमंडळ व साईश्रद्धा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत नाशिक- कळवण तसेच दिंडोरी-पालखेड रस्त्यावरील शहर परिसर रस्त्यावरील खड्डे बुजविले.
यासाठी कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. एकीकडे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचे सर्वत्र राजकारणच केले जाते. कुठे पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण केले जाते, तर कुठे आंदोलन; मात्र यापैकी कोणतेही हत्त्यार न वापरता खड्डे बुजविण्यात आले. (वार्ताहर)