शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

भोंदूंनी पेरले लसीकरणाविषयी गैरसमजाचे विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : कोरोना चाचणी केल्यास डॉक्टर थेट गाडीत घालून नेतात आणि चुकीचा उपचार करतात, कोरोनावर मोहाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सटाणा : कोरोना चाचणी केल्यास डॉक्टर थेट गाडीत घालून नेतात आणि चुकीचा उपचार करतात, कोरोनावर मोहाचे मद्य गुणकारी असून, लस घेतल्यास मनुष्य दगावतात असे गैरसमजाचे विष पेरल्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली, काहींचा बळी घेतला तरी आदिवासींनी चाचणी आणि लसीकरणापासून स्वत:ला चार हात लांब ठेवले. काहींनी चाचणी केली, तर त्यांना समाजाने वाळीत टाकल्यामुळे गावागावात सामाजिक तेढही निर्माण झाली. याबाबत लोकप्रतिनिधींकडून जनजागृती सुरू झाल्याने आता कोरोना चाचणीचे आणि लसीचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पैकी ७५ पदे रिक्त असल्याने यंत्रणा खिळखिळी झाली असून, तालुक्यातील पावणेचार लाख लोकांच्या आरोग्याची जबाबदारी अवघे २०४ कर्मचारी आपल्या खांद्यावर पेलत आहेत.

बागलाण हा आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्यात १७१ गावे असून, २०११ च्या जनगणने एकूण लोकसंख्या ३ लाख ७४ हजार ४३५ इतकी आहे. त्यापैकी आदिवासींची लोकसंख्या १ लाख ४९ हजार ८४६ आहे. पावणेचार लाख लोकसंख्या असलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक मोठा तालुका म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. साल्हेर मुल्हेरसह पश्चिम भाग हा पूर्णत: आदिवासी भाग असताना जनतेला रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य सेवा मिळणे अवघड बनले आहे .वास्तविक बागलाणमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारली आहेत. तरीदेखील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळणे दुरपास्त झाले आहे .तालुक्यात कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत या रिक्त पदांची भरती होणे गरजेचे असताना आरोग्य विभागाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे .परिणामी कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे.

बागलाण तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट त्सुनामी ठरली आहे. पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांनी दोन हजारांचा टप्पा पार केला होता आणि ४८ जणांचा बळी घेतला. यंदाच्या लाटेत चार हजारांचा टप्पा कोरोना बाधितांनी पार केला असून, बळींचा आकडादेखील अडीचशे पार केला आहे. लसीकरण सुरू केल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लसीकरण ४७ हजारांचा टप्पा पार केला असून, सुमारे आठ हजार जणांना दुसरा डोस दिला आहे.

इन्फो...

आरोग्य विभागातील २७९ पैकी ७५ पदे रिक्त

तालुक्यातील सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे या तीन ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून तर ११ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५३ आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जात आहे. तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे त्यावर नियंत्रण असते. बागलाण तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची २२ पदे मंजूर असताना १२ पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक पुरुष वर्गाची ५३ पदे मंजूर असून, १४ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायकाचे १ पद रिक्त आहे. आरोग्यसेविका महिला वर्गाचे ६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १८ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका एनएचएम वर्गातील मंजूर १७ पैकी ४ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायक महिला प्रवर्गाची ११ मंजूर पदांपैकी सहा रिक्त आहेत. निर्माण अधिकारी वर्गाची २ पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची दोन पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहायकांची दोन, तर परिचर १४ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्गाची सर्वाधिक १२ पदे रिक्त असल्याने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचे व रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असल्याने आदिवासी भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.

कोट...

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी भागात दवाखाने बांधली आहेत. पुरेशा प्रमाणात डॉक्टर, कर्मचारी आणि साधने नसल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत आदिवासी अक्षरशः वार्‍यावर आहेत. डॉक्टर आहेत, तर साधने नाहीत, आहेत तर डॉक्टर नाहीत अशी अवस्था या भागाची आहे.

- सोमनाथ सूर्यवंशी, संघटक, काेकणा आदिवासी संघटना, वाठोडा

कोट...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. वर्ष सव्वा वर्ष उलटूनही रिक्त पदे भरली जात नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाला. आदिवासी भागात कोरोनामुळे दगावलेले नागरिक शासनाच्या धोरणांचे बळी आहेत. सध्या मी स्वतः आदिवासी बांधवांमध्ये कोरोना चाचणी आणि लसीबाबत निर्माण झालेला गैरसमज काढण्यासाठी जागृती सुरू केली असून, त्याला यशदेखील येत आहे.

- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

बागलाणमधील गावे

१७१

एकूण लोकसंख्या

३ लाख ७४ हजार ४३५

आदिवासी लोकसंख्या

१ लाख ४९ हजार ८४६

आरोग्य विभागातील पदे

२७९

रिक्त पदे

७५

लसीकरण

४७ हजार

दुसरा डोस

८ हजार

फोटो - १७ सटाणा १

कोरोना चाचणी आणि लसीकरण संदर्भात जनजागृती करताना आमदार दिलीप बोरसे.