जिजाऊ ब्रिगेड-मराठा सेवा संघाचे कवी संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:12 IST2021-01-14T04:12:36+5:302021-01-14T04:12:36+5:30

मालेगाव : जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे मंगळवारी (दि. १२) सायंकाळी कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र ...

Poetry meeting of Jijau Brigade-Maratha Seva Sangha | जिजाऊ ब्रिगेड-मराठा सेवा संघाचे कवी संमेलन

जिजाऊ ब्रिगेड-मराठा सेवा संघाचे कवी संमेलन

मालेगाव : जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे मंगळवारी (दि. १२) सायंकाळी कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र सेवा दल अभ्यासिकेत कवयित्री संमेलन झाले.

या कवी संमेलनाचे उद‌्घाटन जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा देशमुख यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाच्या राज्य सदस्य स्वाती वाणी, निलीमा पाटील उपस्थित होत्या. कवी संमेलनात जिजाऊंच्या गौरवासह अनेक कविता सादर करण्यात आल्या. कवयित्री विजयालक्ष्मी अहिरे, प्रतिभा बोरसे, लता सूर्यवंशी, मनिषा सावळे, विजया भदाणे, वैशाली भामरे, नूतन चौधरी, छाया पाटील, अवंती वाणी, क्षितीजा सोनार यांनी विविध कविता सादर केल्या. अध्यक्ष खैरनार यांनी कविता कशी फुलते, यावर भाष्य केले. सई पाटील हिने मार्गदर्शन केले.

यावेळी साहित्यिक सुरेंद्र टीपरे, रमेश उचित, विवेक पाटील, अनिल पाटील, नम्रता पगार, प्राजक्ता सोनार, मनिषा पाटील, कल्पना पाटील, वसंत अहिरे, वाल्मिक घरटे, विष्णू गुमाडे, राजू साळुंखे आदींसह रसिक उपस्थित होते. राजेंद्र दिघे यांनी सूत्रसंचालन केले तर जगदीश खैरनार यांनी आभार मानले.

Web Title: Poetry meeting of Jijau Brigade-Maratha Seva Sangha