पर्यावरणविषयक कवितांनी रंगला काव्यमेळावा
By Admin | Updated: June 6, 2016 22:56 IST2016-06-06T22:53:00+5:302016-06-06T22:56:36+5:30
काव्यमंच : शेती, दुष्काळासह अन्य विषयांवरही भाष्य

पर्यावरणविषयक कवितांनी रंगला काव्यमेळावा
नाशिक : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या कविता, गझल, पोवाडा आदि काव्य प्रकारातून नवोदित व ज्येष्ठ कवी, कवयित्रींनी रविवारी (दि.५) काव्यमंचच्या काव्यमेळाव्यात पर्यावरण, शेती, दुष्काळ आदि विविध विषयांवर भाष्य केले.
व्ही. एन. नाईक महाविद्यालयात काव्यमंचतर्फे श्रीकांत पूर्णपात्रे यांच्या अध्यक्षतेखाली १५३वा काव्य मेळावा पार पडला. अॅड. मिलिंद चिंधडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ‘काळाजात घातलेला घाव होते’, ‘सुख चुके हैं, नहरो के आँसू’, ‘स्मरतात जिंदगीची आमंत्रणे मला’, ‘आटपाट नगरात होतं एक कपाट’ अशा विविध कवितांच्या माध्यमातून प्रा. शरद पुराणिक, विजय वऱ्हाडे, निशिगंधा घाणेकर, अरुण सोनवणे, राधाकृष्ण साळुंखे, सदाशिव खांडवे आदि कवी व कवयित्रींनी प्रकाशझोत टाकला. दरम्यान, यावेळी काव्यरसिक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)