नगरसूलला विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:09 IST2017-09-05T00:09:09+5:302017-09-05T00:09:16+5:30

येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु होते.

Plunge into the well in the well with the two girls of the city corporation | नगरसूलला विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी

नगरसूलला विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी

येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु होते.
नगरसूल येथील माळवाडी कटके वस्ती शिवारात कमोदकर यांच्या विहिरीत सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान रेणुका संतोष कमोदकर (३०) या विवाहितेने आपल्या दोन मुली, भक्ती (६) व कावेरी कमोदकर (३) या दोघींसह पन्नास फूट खोल विहिरीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच जवळील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. कावेरी कमोदकर जखमी अवस्थेत हाताशी लागली. तिला तत्काळ येवला येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम हातात घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. एस. भापकर, डी. एस. पाटील करीत आहेत. कारण अस्पष्ट
रात्री उशिरापर्यत रेणुका हाताशी लागली नाही. मात्र भक्ती संतोष कमोदकर हिचा मृतदेह सापडला. या नंतर पोलिस व ग्रामस्थांनी पाणी उपसा करण्यास सुरु वात केली आहे. रेणुकांने मुलीसह आत्महत्या करण्याचे कारण समजु शकले नाही. याबाबत येवला पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Plunge into the well in the well with the two girls of the city corporation