डोळ्यात मिरची पूड फेकून शेतकऱ्याची लूट
By Admin | Updated: November 6, 2015 23:28 IST2015-11-06T23:27:05+5:302015-11-06T23:28:20+5:30
डोळ्यात मिरची पूड फेकून शेतकऱ्याची लूट

डोळ्यात मिरची पूड फेकून शेतकऱ्याची लूट
मालेगाव : तालुक्यात कंधाणे शिवारात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून ७२ हजार रुपये पळविले. या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरून बेंद्रेपाडे, ता. धुळे येथील शेतकरी मुंगसे कांदा बाजारात कांद्याची विक्री करून दुचाकीने जात होते. महामार्ग ते बेंद्रेपाडे रस्त्यावर कंधाणे शिवारात रात्री नऊ वाजेला पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि त्यांच्या दोन्ही खिशांतील ७२ हजार रुपयांची रक्कम, मोबाइल व पॅनकार्ड घेऊन पसार झाले. पाटील यांनी परीक्षा फी भरण्यासाठी हा कांदा विकला होता. तेच पैसे चोरटे घेऊन गेल्याने निसर्गाच्या अस्मानी संकटापाठोपाठ सुलतानी संकटाने त्यांना रडू कोसळले. या प्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)