समर्थनगर परिसरात भूखंड पडून

By Admin | Updated: June 6, 2016 00:26 IST2016-06-05T22:33:40+5:302016-06-06T00:26:00+5:30

समर्थनगर परिसरात भूखंड पडून

The plots fall into the adjoining area | समर्थनगर परिसरात भूखंड पडून

समर्थनगर परिसरात भूखंड पडून

  इंदिरानगर : समर्थनगर परिसरात महापालिकेचे भूखंड ओसाड पडून असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहेत, परंतु अद्यापपर्यंत उद्यान विकसित करण्यास उद्यान विभागास जाग आलेली नाही. त्यामुळे बालगोपाळांचा हिरमोड होत आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी समर्थनगर वास्तव आलो आहेत. परिसरात कॉलनी, सोसायटी आणि अपार्टमेंट आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे नवनवीन समस्या उद्भवत आहे. महापालिकेचे सर्व कर भरून सुद्धा आतापर्यंत मूलभूत सुविधांपासून परिसर वंचित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये परिसरात मनपाचे मोकळे भूखंड ओसाड पडून आहेत.
निवेदनाद्वारे आणि समक्ष भेटून उद्यान विकसित करून बालगोपाळांसाठी खेळणी उभारण्याची मागणी केली आहे, परंतु अद्यापपर्यंत मागणी धूळखात पडून आहे. त्यामुळे बालगोपाळांना खेळापासून वंचित रहावे लागत आहे. बालगोपाळांच्या हट्टासाठी काही नागरिकांनी स्वखर्चाने खेळणी बसवली आहे. मनपाच्या उद्यान विभागाने काही ठिकाणी खेळणीची गरज नाही. त्याठिकाणी खेळणी बसवली आहे. ज्या ठिकाणी खेळणीची गरज आहे. तेथे खेळणी बसविण्यात आलेल्या नाहीत अशा अजब कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The plots fall into the adjoining area