प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:49 IST2021-11-28T20:48:54+5:302021-11-28T20:49:49+5:30
जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची दुर्दशा
जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेला होता. या रस्त्याने सप्तशृंगगड, सापुतारा तसेच गुजरात राज्यात जाणारे अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. तसेच या रस्त्याने गुजरातमधील प्रवासी शिर्डी जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने त्यांची नियमित वर्दळ असते. जानोरी, जळूऊके दिंडोरी, आंबे दिंडोरी, शिवंनई, वरवंडी येथील ग्रामस्थ दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दिंडोरी तहसील, पंचायत समिती, पोलीस स्थानक अशा अनेक शासकीय कामांसाठी येथील ग्रामस्थ या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु, या रस्त्याला दोन ते तीन फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच गाडी चालवताना खड्डे चुकवताना अपघात होण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर बांधकाम विभागाने नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील विलास काठे, रेव्हीचंद वाघ, बाजीराव घुमरे, सोमनाथ उगले, गोटीराम वाघ, बाबुराव बोस, विलास भवर, चुनीलाल तिडके, अविनाश वाघ, विलास वाघ, भारत मोरे, पुंडलिक भवर, विश्वास घुमरे, पोपट ढिकले, माणिक घुमरे आणि शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.