शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लेज फॉर लाइफ’  राष्ट्रीय अभियान:  विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:47 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़

नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करतात़ तंबाखूच्या व्यसनापासून विद्यार्थी दूर राहावेत यासाठी ‘प्लेज फॉर लाइफ’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले असून, त्यात आठ जिल्ह्यांतील २५ हजार विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली आहे़  महाराष्ट्रातील सुमारे २६ लाख विद्यार्थी या तंबाखूविरोधी मोहिमेचे संदेशदूत बनले असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ (गेट्स) नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे (२़४) अडीच कोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामध्ये दोन कोटी लोक हे तोंडावाटे तंबाखूचे सेवन करतात तर ४० लाख धूम्रपान करणारे आहेत़ त्यांच्या व्यसनाचा परिणाम व्यसनकर्त्याप्रमाणे निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावर होतो़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाºया आजारांमुळे महाराष्ट्रात ४५ हजार लोकांचा मृत्यू होतो.शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाउंडेशनतर्फे ‘प्लेज फॉर लाइफ’ हे राष्ट्रीय अभियान राबविले जात असून, त्यातून विद्यार्थ्यांना तंबाखूविरोधी माहितीपट दाखवून जागृती केली जात आहे. सोबत तंबाखूविरोधी सामूहिक शपथ घेत शाळा आणि समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.२६ लाख विद्यार्थी संदेशदूत‘प्लेज फॉर लाइफ’ या अभियानानुसार जळगाव (८ लाख ५१ हजार ९४७), अकोला (२ लाख ३७ हजार), अमरावती (३ लाख ८० हजार), नागपूर (२ लाख ४ हजार), चंद्रपूर (१ लाख ९७ हजार १९२), बुलढाणा (१ लाख ४० हजार २७५) तर वर्धा (७६ हजार ९८४) विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम आखण्यात आली असून शपथ घेतलेले २६ लाख विद्यार्थी या मोहिमेचे संदेशदूत असणार आहेत. राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून तंबाखूच्या व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित त्यांची एक साखळी निर्माण केली जाणार आहे. लहान वयातील मुलांपासून जागृती केली जाणार असून, विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावेत यासाठी त्यांना माहिती दिली जाणार आहे. सुरक्षित व तंबाखूमुक्त विद्यार्थ्यांसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने तंबाखू सेवन विरोधी संदेशाबाबत जनजागृती केली जाईल़  - विशाल सोळंखी, आयुक्त, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :cancerकर्करोगStudentविद्यार्थी