नाटककार दत्ता पाटील सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:20+5:302021-08-27T04:19:20+5:30
जळगाव येथील परिवर्तन व भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’त नाटककार दत्ता पाटील ...

नाटककार दत्ता पाटील सन्मानित
जळगाव येथील परिवर्तन व भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’त नाटककार दत्ता पाटील यांचा नेमाडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील गांधी रिसर्च फाउंडेशन येथे संपन्न झालेल्या या महोत्सवात नाट्यलेखन क्षेत्रात अभिनव कार्य केल्याबद्दल उद्घाटनाच्या दिवशी नाटककार दत्ता पाटील यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. परिवर्तनचे शंभू पाटील म्हणाले, की पाटील यांच्या हंडाभर चांदण्या या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीसोबतच ग्रामीण नाट्यपरंपरेत एक नवचैतन्य आणले. त्यांची नाटके आता पुणे, मुंबईच्या विद्यापीठात शिकवली जातात. त्यामुळे असे म्हणता येईल की नाट्यलेखनाचे केंद्र हे पुणे, मुंबईतून सरकत उत्तर महाराष्ट्रात स्थिरावले. याचे श्रेय दत्ता पाटील यांना जाते. याप्रसंगी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आ. राजूमामा भोळे, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड उपस्थित होते. यावेळी अशोक जैन यांच्या हस्ते प्रमोद गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला.
---------------------------------------------------------------------------------------------
फोटो- २६ दत्ता पाटील
जळगाव येथील परिवर्तन व भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने नाटककार दत्ता पाटील यांचा ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार राजूमामा भोळे, परिवर्तनचे शंभू पाटील, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रमोद गायकवाड.
---------------------------------------------------------------------------------------------
260821\26nsk_27_26082021_13.jpg
फोटो- २६ दत्ता पाटील